नवीन लेखन...

“येडी बाभळ”

येडी बाभळ

तवा इथंच, फाटक्या खाकी चड्डीत असताळा, दहाबार वाचून सम्पल्यालं पुस्तक कटाळून खाली ठिवलं. अन मग ‘मी’ शौकानं बसल्या जागीच शेत शेत खेळूलालतो. विहीर खंदलती, पान्यासाठी विहिरीत मुतंलतोबी. हिच्याशिवाय कसलंच झाड नसलेल्या आमच्या शेतातल्या या येड्या बाभळीच्याच पानांचं माळवं अन फुलांची गुलछडी लावून आमच्या माळावरंच नादर हिरवा मळा फुलविल्ता. वाडोळच्यान तिथंच बसून चुलत्याच्या बैलाची वाट बघलालेला माझा बाप… काय झालं माहित नाही तिरमिरीत उठला अन मला मरणाचा हाणित म्हनला “मायघाल्या माझी जिंदगी आदुगरंच मातीत गेलीय आता मझ्यासमोर तुझीबी मातीत घाललालायस व्हय रे आक्क्कर माश्या ” इंगळासारक्या लालबुंद झालेल्या त्याच्या डोळ्यात तवा रागाचं पाणी उकळूलालतं.

आन आज मी पुन्हा इथंच हुबा … गावच्याच शाळंत शिक्षण शेवक झालेला,  निळीत धुतलेले पांढरे शिप कपडे घालून शाळेत शिकवायची पुस्तकं हातात घिऊन निघायच्या तयारीत. फक्त याबारला माझी इस्त्रीची पांढरी प्यान्ट मळन म्हणून उभा राह्यलोय. अन तवाचसारखं येड्या बाभळीखाली बसून वाडोळच्यान कुणाच्या तरी ट्रॅक्टरची वाट बगलालेला माझा बाप. जिमिनीपासून माझं वाढतं आंतर बघून डोळ्यात दाटलेल्या आर्जवाच्या पाण्याचं दार मोडीत म्हन्लालाय “माय हाय रं हि आपली, टेक खाली काई हुईना! अरे राज्या आपल्या समद्यांचीच माती व्हनाराय एक दिस. हिची सवं ठेव असं हिला आंतर दिऊनुक बाबा”

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या येऊ घातलेल्या कथासंग्रहातून साभार

बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या

 पार पब्लिकेशन्स

खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी असलेल्या सवलतीच्या दरात हे  पुस्तक मिळवण्यासाठी इमेल करा paar.publications@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..