पवार, (डॉ.) वसंत
एकच व्यक्ती मनात आणेल तितक्या क्षेत्रांमध्ये किती लीलया संचार करू शकते आणि ठसा उमटवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वसंत पवार. ते ‘समाजासाठी वाहून घेणे’ या वाक्प्रचाराचे मूर्तीमंत प्रतिक होते. समाजाच्या हितासाठी धावत असतानाच त्यांच्या जीवनाची अखेर झाली.
निफाडसारख्या बागायती भागातल्या ‘ओणे’ नावाच्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ रोजी डॉ. पवार यांचा जन्म झाला.
[…]