पवार, (डॉ.) वसंत

एकच व्यक्ती मनात आणेल तितक्या क्षेत्रांमध्ये किती लीलया संचार करू शकते आणि ठसा उमटवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर वसंत पवार. ते ‘समाजासाठी वाहून घेणे’ या वाक्प्रचाराचे मूर्तीमंत प्रतिक होते. समाजाच्या हितासाठी धावत असतानाच त्यांच्या जीवनाची अखेर झाली.

निफाडसारख्या बागायती भागातल्या ‘ओणे’ नावाच्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात ४ एप्रिल १९४८ रोजी डॉ. पवार यांचा जन्म झाला.
[…]

गुप्ते, (कॉ.) वसंत

मुंबईतली कामगार चळवळ जवळपास नामशेष होण्याची चिन्हे दिसत असताना या चळवळीत अतिशय मोलाची कामगिरी बजावणा-या कामगार कार्यकर्त्यांच्या पिढीचे एक प्रतिनिधीत्व करणारे वसंत गुप्ते हे होते. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, साथी जॉर्ज फर्नान्डिस यांसारख्या दिग्गज कामगार पुढा-यांच्या पाठीशी वसंत गुप्तेंसारखे दुस-या फळीतले तितकेच समर्थ नेतृत्व असल्यानेच नव्वदीच्या दशकापर्यंत कामगार चळवळीचा दबदबा महाराष्ट्रात होता. आंदोलनाची रणनीती आणि एकंदर पुढारपण जितके महत्त्वाचे असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच विविध पातळ्यांवर समन्वय साधणारी, बारीकसारीक बाबींची खडा न् खडा माहिती असणारी निष्ठावंतांची दुसरी फळीही महत्त्वाची असते.
[…]

शिंदे, एकनाथ

शिवसेनेची मुळे ही ठाण्यामधील प्रत्येक जागेत रूजविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा सहभाग आहे. सुरूवातीस साधे शिवसैनिक, व मग आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशा एका मागोमाग एक शिडया चढलेल्या एकनाथ शिंदेनी नेहमीच त्यांच्या मतदात्यांच्या आकांक्षाचा व रास्त अपेक्षांचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे. […]

ठाकरे, कुशाभाऊ सुंदरराव

स्व. कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४थे अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. भाजपाचे ते पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष. […]

प्रमोद व्यंकटेश महाजन

स्व. प्रमोद व्यंकटेश महाजन हे भारतीय जनता पक्षातील (भाजप) दुसर्‍या पिढीतील महत्त्वाचे नेते होते. भारताच्या पंतप्रधानपदावर जाण्याची योग्यता असलेला अलिकडच्या काळातील एकमेव मराठी नेता अशी त्यांची प्रतिमा होती.
[…]

सुधीर फडके

सुधीर फडके हे ख्यातनाम गायक व संगीतकार होते. चित्रपटसंगीत, भावगीते, अभंग यासाठी ते खास प्रसिद्ध आहेत. बाबूजी या टोपणनावाने ते परिचित होते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. महाकवी गदिमांच्या गीतरामायण या महाकाव्याचे संगीत आणि सादरीकरण अजूनही मराठी संगीतरसिकांच्या मनात घर करुन आहे. […]

खोपकर, (कॉ) कृष्णा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कृष्णा खोपकर यांच्या राजकीय जीवनाचा आरंभ १९४२च्या भारत छोडो आंदोलनापासून झाला.
[…]

ओवळेकर, (अॅड) रमाकांत

ठाण्यातील नावाजलेल्या वकिलांमध्ये ज्येष्ठ अॅड. रमाकांत ओवळेकर हे सर्वांना परिचित होते. त्यांना आदराने अनेक जण ‘अण्णा’ म्हणत. कोर्टात युक्तिवादासाठी उभे राहिले की प्रतिवादी वकिलांना आता ‘अण्णा’ काय गुगली टाकतील याबद्दल उत्सुकता असे
[…]

चौधरी, बहिणाबाई नथूजी

बहिणाबाई चौधरी ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या.
[…]

अवचट, (डॉ.) अनिल

डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आहेत. त्यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत. […]

1 2 3 4 5 6 8